cold war between commissioner mundhe and nmc standing committee  
नागपूर

...असा काढला मनपा आयुक्त मुंढे यांनी वचपा ! 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेत आयुक्त व सत्ताधाऱ्यांतील संघर्ष आता स्थायी समितीची बैठक रद्द करण्यापर्यंत पोहोचला आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांचे प्रस्ताव धुडकावून लावल्याने येत्या 20 मे रोजी प्रस्तावित बैठक रद्द करण्याचे आदेश देत आयुक्तांनी वचपा काढल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. आयुक्तांच्या आदेशावर स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी नाराजी व्यक्त केली. 

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर विविध विभागांसोबत आर्थिक बाबींवर तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आदीबाबत माहिती घेण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी 20 मे रोजी बैठक घेण्याबाबत प्रशासनाला कळविले होते. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाचा शहरात प्रभाव वाढत असल्याचे कारण पुढे करीत स्थायी समितीची बैठक रद्द करण्याचे आदेश दिल्याचे पत्र मनपा सचिव डॉ. रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना पाठविले. पत्र बघताच स्थायी समिती अध्यक्ष झलके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी दिलेले आदेश मागील स्थायी समितीच्या बैठकीशी जोडण्यात येत आहे. मागील स्थायी समिती बैठकीत आयुक्तांनी सेवानिवृत्तीनंतर नियुक्त अधिकाऱ्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येताच स्थायी समितीची मंजुरी न घेता आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे स्थायी समितीने त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. मागील बैठकीत प्रस्ताव धुडकावल्याने आयुक्तांनी वचपा काढत आता स्थायी समितीची बैठक रद्द केल्याची चर्चा आहे. मागील बैठकीच्या काळातही कोरोनाचा शहरात प्रार्दुभाव होता. त्यावेळी आयुक्तांनी परवानगी कशी दिली? त्यावेळी परवानगी दिली तर आता का नाही? असे प्रश्‍न चर्चिले जात आहे. 

पुणे, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर आदी महापालिकांमध्ये स्थायी समितीच्या नियमित बैठक होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक नियोजन, अर्थसंकल्पाच्या दृष्टीने विविध विभागाचा आढावा घेणे आवश्‍यक आहे. याशिवाय पावसाळी पूर्व तयारी, अर्धवट सिमेंट रस्ते यावर तोडगा काढण्यासाठीही बैठक महत्त्वाची होती. आयुक्तांनी बैठक रद्द करणे योग्य नाही. 
- पिंटू झलके, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT